राजकारण
राजकारण
नाही जमत मला ,
ते राजकारन करायला ।
घेणं न देणं ,
याच्या त्याच्या माग फिरायला ॥
नाही जमत मला ,
ते घरचं खायला ।
अनं बाहेरच्याच गायला ॥
नाही जमत मला ,
त्या जनतेशी खोट बोलायला ।
सतत वर्षानी वर्ष ,
विकासाच्या नावाने मत मागायला ॥
नाही आवडतं मला ,
माझीच माणसं तोडायला ।
जे कधी करत होते माझ्यावर प्रेम ,
हातात शस्त्र घेऊन बसलीत आज
मला च संपवायला ॥
नाही जमत मला ,
ते राजकारन करायला ।
हजार पाचशे घेऊन ,
कुणाचं गुलाम(कार्यकर्ता )बनायला ॥
नाही जमत मला त्यां ,
गाढवाच्या मोलात विकायला ।
नेत्याच्या त्या दोन हजाराच्या ,
नोटा पुढं पा चवर्ष झुकायला ॥
नाही आवडत मला ते ।
राजकारन करायला ॥
