राजहंस
राजहंस
1 min
326
काळ्या आईच्या पोटात शिरून माझा बां जवां ढेकळासंग खेळतो,,,,
तवां त्याच्या निथळणाऱ्या घामातून सोने पिकवण्याचा ध्यास घेतो,,,,
कष्टाने पिकवलेल्या जिंदगीत श्रमाचे महत्व अधोरेखित करताना-
आमच्या सपनापायी
बा जमीनीत सोताची
जिंदगीच पेरतो.,,,
अन् ....
भरभरून येणाऱ्या पिकाला पाहून जवा बा सुटकेचा निश्वास सोडतो,,,,
तवां पिकाच्या जल्मापायी बापाने सोसलेल्या प्रसववेदना पाहून मला माझी माय पुन्हा आठवते,,,,
अन् ,,,,
डोलणाऱ्या पिकाला पाहून बाप जवा राजहंसासारखा चालू लागतो ना,,,
तवा मला शेतकरी असल्याचा अभिमान वाटू लागतो,,,,
