राजेशाही
राजेशाही
1 min
236
अजूनही कुठच्या जमान्यात आहात आपण
भाले, ढाल, तलवार घेऊन हातात आपण
पूर्वजांचा वारसा मिरविणे अभिमान पण
कितीक अंश त्यांचा उतरला आपल्यातपण
नको उगा फुशारकी हवी अंगी धमक पण
कठोर स्वरूप सत्य सांगतो आपला दर्पण
राजघराण्याचे टिकवा मार्दव शालीन पण
जनसेवा कंकण बांधले हवे त्याचे स्मरण
नको विदूषकपणा व्हा गंभीर जाणा दायित्व
लोकांवर गाजवाल राज्य मानतील स्वामित्व
