राहू कशी मी तुझ्याविना
राहू कशी मी तुझ्याविना
1 min
336
ह्या अनामिक लोकांत
मन माझं रमत नाही
सगळे सोबत असूनसुद्धा
तुझ्याशिवाय मज करमत नाही
सगेसोयरे सोबत असूनही
तुझ्यासारखा मला कोणी भासत नाही
विचारतात मला सगळे घरचे
तू का बरे अनोळखी अशी
कशी सांगू मी त्यांना आता
तुझ्यात मी गुंतली आहेस
सांग सख्या मला आरा
उत्तर मी त्यानं देऊ कसे
तुझं ते मला भेटण आता
मला सारखं आठवत आहे
गंध तुझ्या तो मिठीतला
जवळ सारखा मला वाटतो आहे
सांग ना रे सख्या आता
मन माझं मी कसं लावू
लवकर ये ना जवळी माझ्या
राहू कशी मी तुझ्याविना
