STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

रागावर नियंत्रण

रागावर नियंत्रण

1 min
457

ठरवलं तर सगळं होतं रागावर पण नियंत्रण करता येतं

भूतकाळात गेले रममाण झाले जुने दिवस आठवत बसले

स्वप्नं तेव्हा पाहिली साथ देणार कोणी नव्हतं


पापण्यांच्या गोतावळ्यात मन माझं रमलं

काटे टोचले मनाला माझ्या, आधार फक्त तुझा होता

वेदना असह्य झाला हुंकार भासला शब्द माझा


पावसाळी वातावरणात ओल्याचिंब देहाला आग ही लागली

जळत्या या देहावरती स्वप्नांची डरकाळी अंगावरती आली


अबोल माझ्या मनाला दुःखाने घेरलं, निरागस हास्य ते तेव्हा कुठेतरी हरवलं

आसवांनी घर केलं होतं त्यावेळी माझ्या मनावर


हळूच खिडकीतून हवेची धुंद झुळूक गालावरती आली

सगळे विसरुन नवीन स्वप्न पाहण्या जागी मी झाले

आता माझ्या रागावर मीच नियंत्रण ठेवते

सगळ्यांना आनंदी करून आनंदित मी होते


Rate this content
Log in