STORYMIRROR

Stifan Khawdiya

Others

4  

Stifan Khawdiya

Others

राग....

राग....

1 min
132

मार्ग तो कळवंटाचा

आहे क्षणिक नाहक 

येता कधी सुटे तोल

काळ आहे तो घातक


शब्द वापर अयोग्य

शब्द शब्दांनी निर्मित

खटकला शब्द जड

भ्रष्ट बुध्दी झटक्यात


मनी ध्यानी अशांतता

कुविचारांच्या लाटेत 

कशी शब्दांची सुनामी

उठे जिवन दर्यात 


तुझी रागाच्या भरात 

होते ओळख वेगळी 

होतो बदल तुझ्यात 

नाते दुरवता सगळी


बुध्दीहीन ही भावना

नको कधी जिवनात 

भलं न कधी कुणाच  

अंत होतो मरणात


नको उगाचं कुणाचा

राग धरु जिवनात

जरी झाली शाब्दीकता

राग आवार क्षणात....


सदा रागाला मानवा

ठेवशिल ताब्यात तु

रहाशील फायद्यात

जणु जग जिंकला तु


Rate this content
Log in