राधा निघाली शाळेला
राधा निघाली शाळेला
राधा निघाली शाळेला
(सांग सांग भोलानाथ)
कान्हा : सांग सांग राधे राधे
शाळेत येणार का?
शाळेमध्ये येऊनि
वर्गात बसणार का?
राधा: काय सांगू कान्हा तुला
भीती मला वाटे
लांब छडी पाहुनच
डोळ्यांत पाणी दाटे
माझी ही व्यथा कोणी
समजून घेईल का?
सांग सांग कान्हा मी
कशी येऊ शाळेला?।।
कान्हा : उरली ना शाळेत
आता कसली भीती
गुरूजी आणि बाई
मुलांसवे गाती
छान गोड गाणी
तूही गाणार का?।।
सांग सांग............
राधा : पुस्तके नाहीत मला
अन् गणवेष नाही
तशी आले शाळेत जर
रागावतील ना बाई
हेड सरांकडे माझी
तक्रार जाईल का?
सांग सांग कान्हा.......
कान्हा :मोफत पुस्तके अन्
आहार मिळतो ताजा
खेळ सारे खेळताना
येते भारी मजा
मार तर मुळीच नाही
आता तरी हसणार का?।।
सांग सांग............
राधा : गणिताचे अंक किती!!!
पुस्तकात मोठे धडे
वर्गात बसून बसून
कंटाळवाणे वाटे गडे
खेळायची हौस माझी
कधी पूरी होईल का?।।
सांग सांग...............
कान्हा : खेळ,गाणी,गप्पा,गोष्टी
मैदानावर होते मस्ती
रंगीबेरंगी चित्रे खूप
उपक्रमांशी कर दोस्ती
सहलीची मजाच भारी
क्षेत्रभेटीस येणार का?।।
सांग सांग.................
राधा : खरंच की रे कान्हा
आता बदलली शाळा
तुझ्यासारखा मलाही
लागेन तिचा लळा
येऊ दे मलाही आता
हसत हसत शाळेला।।
थांब थांब कान्हा
मला येऊ दे रे शाळेला.
