पूर्णविराम देऊनी गेला
पूर्णविराम देऊनी गेला
1 min
11.5K
अश्रू माझ्या डोळ्यातील
स्वप्नी ते वाहुनी गेले
गालावरी हास्य माझे
हळुवार पुसूनी गेले
हसतानाचा आवाज माझा
कसा होता तो विसरली आहे
बोलतानाचा गोडवा माझा
तो कधीचाच संपला आहे
सद्यस्थितीला तू माझा
मला तू सोडूनी गेलास
माझ्या स्मरणात होतास
मला पूर्णविराम देऊनी गेलास
