STORYMIRROR

विवेक द. जोशी

Others

4  

विवेक द. जोशी

Others

पुस्तकं

पुस्तकं

1 min
275

पुस्तकचं गुरू मित्र

पुस्तकचं संदेश पत्र

पुस्तकचं अथांग ज्ञान

पुस्तकचं वरदान ! सन्मान!!

अक्षरांची बोटं धरून

पुस्तकात शिरलो...

शब्द अर्थांच्या

ज्ञान उपासनेत रमलो

अन् चिंतनाच्या वाटांवरून

चालू लागलो...

पुस्तकाने दिला

ज्ञानाचा तिसरा डोळा

नवसंदर्भ गर्भीत अर्थ

कवितांचा झोपाळा...!

चरित्र आत्मचरित्र अन्

कथा कादंबऱ्या

धर्म अर्थ काम मोक्ष

.........या.......

ज्ञानाच्या एकाच पाणवठ्यावर

पंचेंद्रिय झाले आहेत गोळा...!

   अनेक भाषा ,शब्द अर्थांच्या

  ज्ञान संवेदनांच्या अक्षर ओळा !

उमलत्या भावभावनांपासून 

आनंदाचे तरंग तर कधी...

दडपलेले बंद ओठांचे हुंदके

प्रत्येकजण येथे मनमोकळं करीत होते..

जसे धुवाधार पावसांचे बुंदके--!

मनमुराद अभिव्यक्त होताना

मनातील भावभावनांच्या उंच उंच लाटा

नुकतंच स्वातंत्र्य मिळाल्यासारख्या

मोकळे आकाश चुंबीत होत्या..!

अंत:करणातील नवरस उधळताना

मन:पुर्वक मनातून ...पुस्तकातून...!

       


Rate this content
Log in