पुस्तक
पुस्तक
1 min
206
काय सांगावे ते किती
ज्ञान देणारे ते गुरु
पुस्तकांचे त्या महत्त्व
आहेत ते कल्पतरू
पुस्तकांशिवाय आहे
आपलं जीवन व्यर्थ
त्यांच्या मुळेच आपल्या
आहे जीवनाला अर्थ
पुस्तकेच असतात
खरे आपले मित्र
त्यांच्यामुळे बदलते
आपल्या आयुष्याचे चित्र
पुस्तकांमधूनी आपण
शिकतो सारं काही
त्यांची जागा कोणीही
घेऊ शकतच नाही
गिरवताना आपल्या
आयुष्याचे धडे
पुस्तकांची आपल्याला
कायम गरज पडे
