पुस्तक मित्र
पुस्तक मित्र
1 min
230
पुस्तकात असतात सोन्यासारखे विचार
पुस्तक वाचण्याने होतो मनी शुद्ध आचार
आपला रिकामा वेळ वाचण्यात घालवावे
जीवनात फक्त पुस्तकाशी मैत्री करावे
पुस्तक देत नसतात कधीच दगाफटका
रिकाम्या वेळेच्या प्रश्नातून देत असतो सुटका
चांगली पुस्तके असावी नेहमी सोबतीला
खरेदी करून वाव द्यावे पुस्तकाच्या किंमतीला
दिसामाजी एक तास तरी पुस्तक वाचावे
पुस्तक वाचण्याची चांगली सवय लावून घ्यावे
डोळ्यांना वाईट असणारे चित्र पाहू नये
घाणेरडी नि अश्लील पुस्तक वाचू नये
