पुस्तक आयुष्याचे
पुस्तक आयुष्याचे
1 min
228
पुस्तक आयुष्याचे...
असते रंगीबेरंगी फार,
सुखदुःखाची गाणी
असतो जीवनसार...!
आयुष्याची कहाणी
रामायण, महाभारत...
जगण्या मरणाची ओढ
चित्र आपले दाहक...!
पानोपानी कथा,व्यथा
आसू आणि हसू...
भुतकाळ डोळयापुढे
लागतो आपल्या दिसू.
पुस्तक आयुष्याचे...
चाळून एकदा पहावे,
विसरून जावे दुःख
सदा सुखी रहावे...!
आदर्श देईल जगाला
असेच मला जगायचे,
जगण्याचे सूत्र सांगते
माझ्या पुस्तक आयुष्याचे.!
