STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

पुरुषा ऐक एक हाक...

पुरुषा ऐक एक हाक...

1 min
229

ओळखतॊस ना तू स्त्रीमन 

तर जप ते मायाळू धन 

मायेचं तुझ्या फुटू दे श्रीफळ


पुरुषी कठोर भार हृदयाचा 

काढ चिमटा त्यास करुणतेचा 

उधळू दे गुलाल अशा प्रेमाचा


जहागीर नाही मान समज 

प्रत्येक स्त्रीस सन्मान समज 

होऊ दे तिच्या स्वप्नांचा जयघोष


पुरुषसत्तेचा पाढा जरा विसर 

स्त्रीसत्तेचा वाच आता जागर 

दोघांस भरवू दे उद्याची घागर 


ताकद तुझ्या निडर कंठात 

लढ तुझ्या तिच्यासाठी जगात 

बरोबरीचा होऊ दे उदय विश्वात 


Rate this content
Log in