STORYMIRROR

Prashant Shinde

Others

1  

Prashant Shinde

Others

पुरणपोळी

पुरणपोळी

1 min
958

सणावार आला की पुरणपोळी

गुढी पाडव्यासह घरोघरी बेतलेली

अंबाबाईसाठी शुक्रवारची

हमखास आवर्जून ठरलेली


हा हा करीता पोळी

हळूच तव्यावर फुगवायची

अन हळूच अलगद ती वरच्यावर झेलायची

अन परस्पर तुपासवे खायची


काय सुरेख बेत हा आपल्या

सणावारांच्या खाद्याचा

आठव आणतो अजूनही

सुख भोगल्या त्या दिवसांचा


मऊ लुसलुशीत पुरणपोळी

त्यावर साजूक तुपाची धार

गरमागरम ताटात येता

घ्यावा वाटायचा तिचा समाचार


पुरणाची गोडी जरी तोंड पोळी

तरीही भाग्य असायचे प्रत्येकाच्या भाळी

सणावारी जमायची सारी मांदियाळी

वाटायचे घरीच आहे सारी आळी


आता गल्ली गेली, आळी गेली

प्रगतीच्या भडिमारात पोळी दुरावली

आता घरी नांदायला वाटते ती सोकावली

पोळीच झाली आता मॉलवाली


पण आठवण आली तरी

डोळ्यात पाणी आणते

आजही घरोघरी सणावारी निदान

ती अजूनही आवर्जून घरी दिसते..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन