पुण्य नाही का रे माझ्या गाठी
पुण्य नाही का रे माझ्या गाठी
1 min
155
पंढरीच्या विठुराया कारे
झालासि सोवळा
नाही तुझी गळाभेट
पाणी दाटले रे डोळा
झाले तुझे मुखदर्शन
परी नाही निवाले मन
नाही ठेवला पायी माथा
दूर राहिले तुझे चरण
पंढरीच्या विठुराया
का रे लोटलेस दुरी
आले तुझ्या पंढरपुरी
भेटीची आस नाही पुरी
तू अनंत ब्रह्मांडाचा पिता
चालविसी जगताला
तू असता पाठीराखा
आम्ही का भ्यावे करोनाला
तू झालासी देऊळबंदी
आम्ही करावे काय
तूच बाप तुच माय
अंतरले तुझे पाय
देवा येई उठाउठी
देई मज गळाभेटी
इतुकेशे पुण्य नाही
का रे माझ्या गाठी
