पुन्हा तोच पाऊस
पुन्हा तोच पाऊस
1 min
408
पुन्हा तोच पाऊस
पुन्हा तोच चिखल
गुंतलेल्या नात्याची
व्हावी कशी उकल!
पुन्हा तोच गंध
पुन्हा तसाच दरवळ
घुसमटलेल्या श्वासांनी
कसा जाणावा परिमळ!
पुन्हा तेच इंद्रजाल
पुन्हा तोच लखलखाट
करपलेल्या बिजांनी
कुठे रुजवावी वाट!
पुन्हा तोच वारा
पुन्हा तीच वावटळ
आशंकीत काहुरांची
कशी शमावी वर्दळ!
