पुन्हा पाऊस आला जोराचा
पुन्हा पाऊस आला जोराचा
1 min
166
पाऊस आला जोराचा
आडोसा मिळाला परोपकारी झाडाचा
आठवण झाली घराकडे परतण्याची
पाहत होतो किती आहे निसर्ग चमत्कारी
काहीवेळ वाचवले वृक्षाने
पण आता ओलाचिंब झालतो थेंबाने
भीती होती पुस्तकं भिजण्याची
धारा नाव घेत नव्हत्या थांबण्याची
पुस्तकांसोबत मनही झालतं आलंचिंब
खर्याअर्थी पाहत होतो निसर्गाचेच प्रतिबिंब
ओला वारा करत होता मनाला स्पर्श
चोहीकडे पसरला होता आनंदाचा हर्ष
इशारा मिळाला विजांचा
पुन्हा पाऊस आला जोराचा
