पुन्हा नव्याने सुरुवात.....
पुन्हा नव्याने सुरुवात.....
अवघड असतं खरं
पुन्हा नव्याने सुरुवात करणं
कोडं असतं सतावणारं
ज्याचं उत्तर अनोखं शोधायचं
सुरुवात ते शेवट मधलं अंतर
मात्र सतत झुलवत ठेवणारं
आशा-आकांक्षेचं वादळ
मोठा डोंगर अनिश्चिततेचा
वाट शोधणारं अवघड कोडं
नव्याने मांडणारी हिंमत स्वप्नाची
पुन्हा पुन्हा किरण आशेचा
नव ध्येयात नव्याने शोधायचा
नव्या पहाटेचं नवं रोपटं
नव्याने वाढवायचं नि जगायचं
लक्ष्य पूर्णतेचा डोंगर निश्चयाने
असाच जोमाने सरायचा
भावनांचा प्रपंच छिन्नभिन्न करणारा
वादळ भिडणारं मनाच्या दरीला
पेलायचा समुद्र धावत्या प्रवाहाचा
मनाची पुन्हा नव्याने सुरुवात
