Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sarika Jinturkar

Others

3.5  

Sarika Jinturkar

Others

पुन्हा एकदा

पुन्हा एकदा

2 mins
203


मावळणारा दिवस नेहमीप्रमाणे आजही भेटला, शांत गंभीर चेहरा 

माझा समाधानाने हसला 


टिपता नयनी रम्य संध्या सोहळा पुन्हा एकदा मनी दाटला एक वेगळाच उमाळा

शांत होती सृष्टी सारी 

स्तब्ध झाली झाड वेली

क्षितिजाजवळ रेंगाळलेली किरणे ही कातरवेळी 

नभी झाली, निळ्या केसरी रंगाची शिंपण क्षितिजावर पसरले सुवर्ण तपकिरी ते झुंबर

पसरवूनी दोन्ही हात जणू कवेत घेते त्यास अंबर 


पुन्हा एकदा सांज आज 

अलवार आली, रंग नवे घेऊनी 

झाले आकाश आरक्त

 दिसे गालावर जणू लाली


सळसळता वारा, बेधुंद करणारा आसमंत सारा बघता 

सुंदर रम्य हा देखावा....


 सप्तरंगाची उधळण करत झुकला रवी मावळतीला 

धरणीनेही कूस बदलली भेटण्यास रजणीला 

 मंद चांदण्या सोबती साज नवा लेऊनी क्षितीजाआड विसावण्या निघाला सरत्या वर्षाला निरोप द्यावयास हा सृष्टीचा धनी🌅


निरोप देत होती सारी सृष्टी 

तेजाच्या त्या वलयाला

 घ्यावा आपणही सरत्या वर्षाचा निरोप सहजच वाटले मनाला

 

सरत्या वर्षानेनाही म्हणता म्हणता शिकवल खुप काही शेवटी

नियतीपुढे कुणाचेच काही चालत नाही.... 

आपल्या गैरवर्तनामुळे झाले आपलेच हाल त्यामुळे आता तर तक्रार कुठलीच नाही ....


 हातात उरलेल्या फक्त कडू-गोड आठवणी

 निसटून गेले क्षण,हे वर्ष मनात भरपूर काही साठवूनी 

म्हणून पुन्हा एकदा उलटून टाकू

 वर्षाचे शेवटचे पान 

येणारा दिवस नवचैतन्य घेवून येईल या उमेदीने काय॔रत राहू छान..

 

गेलेल्या क्षणांची, दिवसांची भाषा 

आज उमजली, उशिरा फार 

कशास त्रास या जीवाला,

धडा शिकवला निसर्गाने आता तरी ठेवू या त्याच्या उदारतेची जाण...

 आनंदाने नक्कीच वाहेल मग ही जीवनधार...


 हे मिळेल तेही मिळेल असे नशीब का....? सगळ्यांचे भिन्न असते आकाश..... गरुड आणि बगळ्यांचे ....


खंत बाळगून संत होईना 

वेळ निघून जाई दिवस-रात्र धावताना 

धावपळीचे आयुष्य जगताना 

माणूस हरवला आहे सुखामागे धावताना 

म्हणूनच

 सुख दुःख सारे विसरून बाजूला ठेवू.... निसटलेले क्षण पुन्हा नव्याने अनुभवू.... करूया पुन्हा एकदा नव्याने नवीन वर्षाची सुरुवात .... पेलत सारी आव्हाने आयुष्याला देऊया सुंदर आकार 

प्रयत्न करीत करूया सर्व आपले स्वप्न साकार 

 कारण सूर्यास्तानंतर सूर्योदय आहे

 मावळून जातील निराशा फक्त धीर असावा 

 दुःखानंतर सुख हा विश्वास सदैव मनी बाळगावा 🙏😊


Rate this content
Log in