STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

पत्राची दुनिया

पत्राची दुनिया

1 min
228

हळूच उघडून पाहिलं

जुनी कागदाची पेटी मात्र

त्यात सापडली अनेक

पोस्टानी आलेली पत्र

दूर शिकायला असताना

खुशाली कळविलेली पत्र

पैश्याची गरज आहे म्हणून

रुपये मागणी केलेली पत्र

नोकरीसाठी अर्ज केल्यावर

मुलाखतीसाठी आलेलं पत्र

प्रत्यक्षात नोकरीवर रुजू व्हा

म्हणून नेमणूक करणारी पत्र

आनंदाची खुशाली सोबतच

प्रसंगी दुःखाची ही पत्र

त्या पेटीत शोधतांना

असे अनेक मिळाली पत्र

पत्राच्या दुनियेत हरवताना

आठवून गेली अनेक मित्र


Rate this content
Log in