STORYMIRROR

Poonam Jadhav

Others

4  

Poonam Jadhav

Others

पत्र

पत्र

1 min
313

सोशल मीडिया नव्हते,

नव्हते फोन कॉल्स,

जुना होता जमाना,

तेव्हा चालायचे पत्रव्यवहार.


महिनोन्महिने वाट पाहून,

तेव्हा, एखाद पत्र यायचं,

व्हिडीओ कॉल्स नव्हते,

पण कागद वाचून मन कळायचं.


राजा-महाराजांचे डावपेच,

सिमेवरच्या सैनिकांचे अश्रु,

रोमियो ज्युलियट चे प्रेम,

पत्रांनीच सगळं जपलं होतं.


काळ आणि वेळ,

सारंच किती बदललं,

पत्र कसं लिहायचं,

हेही शाळेत शिकवावं लागलं.


२०व्या शतकातल्या टेक्नॉलॉजीने,

जग मात्र जवळ आलं,

विना शाईचे शब्द अन्

त्याला स्माईली नी सजवल.


प्रगती खुप झाली,

पण लुप्त झाल्या त्या मौल्यवान गोष्टी,

ती,लाल रंगाची टपाल पेटी,

खाकी कपड्यांतले पोस्टमन काका,

आणि, मायेच्या लेखणीने लिहिलेलं पत्रही!!


Rate this content
Log in