STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

3  

Neha Ranalkar(Nawate)

Others

पताका

पताका

1 min
164

घेऊ पताका

वारकरी संप्रदायाची हाती

जातीभेदा मूठमाती

देऊनिया।।


भागवत धर्माचा

पाया घाली ज्ञानदेव

कळसावरी ठेव

तुकोबाराय।।


पंढरीचा राणा

सखा त्यांचा पांडुरंग

गाऊनिया अभंग

तयालागी।।


सर्वची संत

याची मार्गावरून गेले

शिष्यांनाही नेले

अनायास।।


मनीमानसी वारकऱ्याच्या

दाटे भक्तीचा उमाळा

त्यालागी जिव्हाळा

माऊलीचा।।


समतेचा उपदेश

असे नाम संकीर्तनात

तल्लीन किर्तनात

भक्तीसाठी।।


Rate this content
Log in