पसा
पसा
1 min
110
- भुकेला हा जीव भुकेला हा देह पोटी काव काव कावळ्याची
- बाळ चिमुकले माझे छातीस धरले ओझे.ओढुनही पान्हा मला फुटेचना
- शोधिशी घरात माझ्या मिळेल का शीत ऐक मोकळ्या नभात डोळा अश्रू वाही
- येता शेजारीण दारी खुशाली विचारी भली वरूनिच हसले मी पण खोटेच ते!!
- पाहुन उदास तिने ओळखली व्यथा म्हणुन मागितला पसा मीच शिजवाया
- सजलेले ताट जरी मांडला पाट भारी धजेना हाथ का?त्याला स्पर्षणया
- असे पसा पसरून किती दिस मागायचे जगावे कि मरायचे कळेचना
- हातातल्या बाहुलीला पाहून जीव हलला कशाला हा जन्म दिला माऊलीचा .
