STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

4  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

प्रवास

प्रवास

1 min
74

लहानांपासून थोरांना

सर्वांना आवडतो प्रवास

याचदरम्यान मिळतो

एकमेकांचा सहवास


वर्षातून एकदा होते नियोजन

दूर कुठेतरी भटकायचं

अनोळखी स्थळांना देऊन भेट

सारी माहिती मिळवायचं


कुणी निवडतो बसचा मार्ग

कुणी जातो आगगाडीने

प्रवासाचा त्रास नको म्हणून

काही जातात चारचाकी गाडीने


प्रवास म्हटले की ठरलेला

असतो थोडा त्रास नि मजा

वेळेवर खाणे मिळत नाही

काही गोष्टीची मिळते सजा


प्रवासाने मिळते खूप माहिती

मेंदूत साठविले जाते चिरकाल

प्रसिद्ध ठिकाणी भेटी देऊन

तयार करावे माहितीजाल


Rate this content
Log in