Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

manisha khamkar

Others

3  

manisha khamkar

Others

प्रवास

प्रवास

1 min
382


 जीवनाच्या प्रवासात

 भेटतात काही माणसे

काही कामापुरती,

काही कारणापुरती

काम संपले कि 

निघून जातात ऋतूसारखी

जगण्याचा मौसम 

बदलून टाकतात वादळासारखी

 प्रवास मजेत होतो 

एकमेकांत हरखून जातो

प्रवासातील आठवणींना 

मनात जागा देतात

क्षणभराच्या सहवासाने 

गुंतागुंत होते ह्रदयांची 

पुन्हा भेटू या आशेवर 

जीवन जगत राहतो

आनंदाचा शिडकाव्याने

जीवन उजळून जाते 

 गप्पा गोष्टी करता-करता

मस्त गट्टी जमते

पण मध्येच प्रवास संपतो

आपला किंवा त्याचा थांबा येतो

आपण दुनियेच्या बाजारात

 हरवून जातो अनोळखी चेहर्यांत

शोक करत बसत नाही,

तो आता नाही आपल्यात

 आता नव्याने प्रवासात 

जुने क्षण आठवतात

ती पळणारी झाडे,

ती गाडीतली सीट

ती सीटजवळची खिडकी,

अनोळखी भिरभिरणारी नजर

पूर्वानुभवाच्या सुखद प्रवासाचे 

पुन्हा नव्याने साक्षीदार होतात



Rate this content
Log in