STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Others

3  

Neha Ranalkar(Nawate)

Others

प्रवास जीवनाचा

प्रवास जीवनाचा

1 min
524

जीवन हाच एक प्रवास

आदी कडून अनंताकडे!

अशाश्वत अशा जगाकडून 

 नेतो शाश्वत जगताकडे!!१


सुख- दुःख,आशा- निराशा

यश- अपयश येती ठिकाणे!

मुक्काम येथे काही क्षणांचा

प्रवास करावा क्रमाक्रमाने!!२


नाती - गोती, मित्र -मंडळीना

जावे लागते भेटायला गावी!

नोकरी,धंदा वा जिविकेसाठी

पर्यटनस्थळे ही वाटती पहावी!!३


मिळवून देई कधी मनस्वीआनंद 

कधी मनस्ताप नि जास्त दगदग!

तरीही प्रवास हा लागतोच करावा 

जीवाची होण्या दूर ती तगमग!!४


काहींसाठी असे छंद ही भटकंती

देश विदेश पर्यटनाची नामी संधी!

हे विश्वची 'माझे घर 'मानना-यांना

मनी लावावी वाटे पर्यटनावरच बंदी!!५



Rate this content
Log in