STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Others

4  

Nurjahan Shaikh

Others

प्रवास गायकीचा

प्रवास गायकीचा

1 min
350

बोल बोबडे बालवयात 

मधूर वाटे ऐकण्यास, 

धडे मिळे गायनाचे 

संगीतातून बोलण्यास. 


छंद झाला नाद खुळा 

ध्येयवेडी लता झाली, 

गोड गळा गातच राहिला 

दुनिया सारी ऐकत गेली. 


लोकप्रिय गाणी वाजली 

पार्श्वगायिका लता मिळाली, 

वर्षाव झाला पारितोषिकांचा

अनेक दशकात प्रसिद्ध झाली. 


खडतर हा प्रवास जिचा 

चांदण्यातही चमकत राहिला, 

भोळीभाबडी लता पासून 

गानसम्राज्ञी चा किताब पाहिला.


अवघड होती शोधण्यास 

ही वाट यशाची चांदण्यातली, 

तरी न डगमगली गाणं कोकिळा 

गात राहिली गाणी गोड आवाजातली.


Rate this content
Log in