प्रवास एकटीचा
प्रवास एकटीचा
1 min
192
जन्माला आली मुलगी
नाही आनंद झाला कुणाला विशेष
नाही केले कुणी कोड कौतुक
सुरु झाला तिचा एकटीचा प्रवास
लहानपणापासून द्यावी लागली आहुती
तिच्या इच्छा आकांक्षा मारून
केला तिचा कोंडमारा
दुसऱ्यांसाठी जगणे हेच कर्तव्य घेतले तिने मानून
बंधन झुगारणे नाही जमले तिला
परिस्थितीशी जुळविण्याची
सवयच लागली जणू तिला
होळी केली तिने स्वतःच्या इच्छा आकांक्षाची
