STORYMIRROR

PRAMILA SARANKAR

Others

4  

PRAMILA SARANKAR

Others

*प्रत्येक सकाळ....

*प्रत्येक सकाळ....

1 min
279

प्रत्येक सकाळ रोज तुझी

नवीन आठवण घेऊन येते

नवचैतन्याची लहर घेऊन

जीवनी आनंदाची बहार आणते....


प्रत्येक सकाळ तुझ्या सोबत

आशा नव्या आणते

जगण्यासाठी मनी माझ्या

उमेद नवी जागवते....


प्रत्येक सकाळ तुझ्या सुमधुर

हास्याने उगवते

स्वप्नांना माझ्या पंख लावून

उंच भरारी घेण्यास सांगते...


प्रत्येक सकाळ तुझ्या

परिसस्पर्शाने जागवते

नवनवीन आव्हाने देत

स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सज्ज करते....


प्रत्येक सकाळ माझी

तुझ्या बासुरी ने मोहरते

तनमनावर तुझ्या आवाजाची

छाप सोडून जाते.... 


प्रत्येक सकाळ तुझ्या चाहुलीची

ईश्वराने जोडलेल्या सुमधूर नात्याची

आपल्या प्रेमाच्या जाणिवेची

तुझ्या आणि माझ्यातील अनमोल ऋणानुबंधाची.... 


प्रत्येक सकाळी अशी किमया 

रोजच माझ्या सोबत घडते

तुझ्या अस्तित्वाची जाणीव

क्षणोक्षणी मला करुन देते..... 

तुझ्या अस्तित्वाची जाणीव क्षणोक्षणी मला करुन देते....


Rate this content
Log in