परतूनी तु येशील का?
परतूनी तु येशील का?
नजरेत सल कळजातली भाव मनी दाटलेले
शब्द ओठी थांबतील भाव नयनी तोच आहे
येशील का परतुनी पुन्हा ती रात्र मनी दाटते
वळणावर या नभाचे हात पुन्हा मागशील का?
भाव जिव्हारी लागतील गाव तुला आठवेल का ?
क्षितिजाला गवसणी घाले नवखे भान मनातले
आसमानी रंग मनातील आस सांजेस लागलेली
आजहीआयुष्याची लकेर ती उधार जाहलेली
आठवणीचा गोपा घेऊनी खोपा भविष्याचा बांधशील का?
आजही त्या वळणावरचे घाव मनी झेलशील का?
ओढ जीवा लागलेली आसक्ति मनी जागलेली
मन ईवलस घेऊनी ही श्वास स्वप्नांस मिळालेले
जगण्यास भास जाणलेली आस ही मनी छळते
फिरूनी वादळेच ती उध्वस्थ जग पुन्हा सावरेल का?
साठवणीतले भाव फिरूनी तुझ्या मनास भावतील का?
