STORYMIRROR

Gangadhar joshi

Others

4  

Gangadhar joshi

Others

परतुनी

परतुनी

1 min
84

परतुनी ये तू त्या वृंदावनी

ये तू सोबत राधा घेऊनी


नील रंगातुनी अलगद यावे

सोनकवडसा पुलकित व्हावे

सुगंध यावा जसा केतकीतून

ये तू सोबत राधा घेऊन


कदंब वृक्ष तरु तिरीतून

ऐकू येई साद अंबरातून

लता वल्ली पल्लव चामरातून

ये तू सोबत राधा घेऊन


नटनागर तू नट गिरीधर

मीरेचा तू मित्र कलंदर

विष प्राशन का? तिच्या प्राक्तनि

ये तू सोबत राधा घेऊनी


साहित्याला गुण द्या
लॉग इन