प्रतीक्षा
प्रतीक्षा
1 min
255
सर्व वेदनांवर औषध ठरतो
नवी उमेद देतो येणारा काळ
चैतन्याने प्रत्येक क्षण जगावा
तुटण्या आधी श्र्वासांची माळ
झरझर वेळ कसा निघून गेला
आमचेच आम्हास नाही उमजले
काय गेले काय उरले याचे हिशेब
नीटपणे अजूनही नाही समजले
सुखाचे क्षण क्वचित काळ राहतात
दुःखाचे क्षण लवकर नाही सरत
फार पुढे निघून आलोय केव्हाचे
वाटूनही आयुष्य मागे नाही फिरत
काय योग्य केले काय चुकविले
स्वतःचीच करायला हवी समीक्षा
काळाकुट्ट अंधारानंतर आतुरतेने
करतो आपण उजेडाची प्रतीक्षा
