परतीचा पाऊस
परतीचा पाऊस
1 min
193
परतीच्या पावसाचा कुठे दणका
कुठे आभाळात त्या विजांच्या चमका
कुठे वादळ कुठे जखमांच्या ठणका
कुठे शिंतोडे कुठे पुरांचा हो विळखा
कुठे उध्वस्त घरे कुठे गडगडाट
कुठे जलाशयात नुस्ता खडखडाट
वेधशाळेला ही कळेना कुठे वर्षाव
पिकांचे मातेरे बळीराजावर घाव
नवरात्रीचे सृजनशक्तीचे उठाव
मान्सून परतताना निसर्गाचे डाव
बदलला वारा बदलते दिशा वेळ
मान्सून मोसमाचा कसा घालावा मेळ
