प्रशंसा...
प्रशंसा...
1 min
51
चांगल्या कामाची भावना,रुजवण्याचा मार्ग प्रशंसा,
प्रशंसा असते कामाला दाद,त्याविन माणूस राहील कसा
धडपडणाऱ्या माणसाच्या पाठीवर,कौतुकाची पुरेशी थाप,
प्रसंशेने माणसं सुखावतात,त्याचे नसते काही मोजमाप
खुशामत करणारी माणसं, स्वार्थापोटी अवतीभोवती,
प्रशंसा हृदयातून येते, खुशामत असते वरवरती
मोठं व्हायचं असेल तर,इतरांना मोठं करा,
यशाचा यापेक्षा मार्ग नाही सोपा,इतरांचे कौतुक करा
