प्रश्नांचा गुंता
प्रश्नांचा गुंता
1 min
204
प्रश्नांचा गुंता
साचला मनात
हे प्रश्न कधी सरळ तर कधी उलट
काही प्रश्न खोलवर गेलेले
तर काही प्रश्न हृदयाला भिडलेले
अगणित प्रश्नांचा गुंता
आरंभापासून ते अस्तापर्यंत
शब्द सुचतात ते व्यक्त होतात
त्याचं शब्दातून प्रश्न उद्भवतात
ते जातात कधी डोक्याच्या पलीकडे
काही उलट तर काही न सुटणारी कोडी असतात
