प्रश्न
प्रश्न
1 min
11.7K
माझे आहे तुझ्यावरी निस्सिम प्रेम
माझ्या भावनांना समजून घेशील का ?
मी रंगविली स्वप्ने तुझ्या प्रेमात
त्या स्वप्नांना सत्यरुप देशील का ?
मी तुझ्यासाठी त्यागले माझे घरदार
तुझ्या मिठीत मला सहारा देशील का ?
मी देत राहिले धोका दुनियेला
तू माझ्याशी निष्ठेने वागशील का ?
जरी न देवू शकलास सहारा मला
माझ्या शवास मूठमाती देशील का ?