परस बाग
परस बाग
1 min
417
अबोल अबोली आज बहरून आली
तिला पाहून गोकर्ण मनोमनी सुखावली
जाई-जुईच्या कळ्यांचा गंध दरवळा
मोगराही पानोपानी बहरून आला
रातराणीचा सुगंध आसमंतात भरला
बकूळ फुलांनी सडा अंगणी घातला
लालबुंद जास्वंद दिलखुलास हसली
गुलाबाची कळी पानामागून लाजली
माझ्या अंगणीची बाग आज नटली थटली
दूर गेलेली पाखरे पुन्हा फांदीवर विसावली...
