परमवीर
परमवीर
1 min
114
दिनरात सीमेवर जागतो परमवीर
रक्षतो देशभूमी तो अभिमान कर्मवीर।।
तळपतो वाळूवरी रवीतेज घेऊनी तो
अखंड न थकता पाण्यावाचून राही तो।।
दगडी पहाडात तो बुरुजासम तटस्थ
ऐशा सेनापतीला मी सदैव नतमस्त।।
सियाचिनी बर्फामध्ये खडक जीवन ज्याचे
सारे बिकट सोडूनी वेध गुलाबी थंडीचे।।
घेऊन प्रतिभासूर्य देशास प्राण अर्पितो
निधड्या छातीवरी तो वैऱ्याचे घाव झेलतो।।
अढळ उभा सीमेसी, आम्ही शांत घरामध्ये
ही कृतज्ञता आमुची, तू स्थिर हृदयामध्ये।।
