STORYMIRROR

pranav kode

Others

4  

pranav kode

Others

परमेश्वर

परमेश्वर

1 min
350

ध्येय दूर माझे

अधांतरी चंद्रासम

कष्टाविण नाही तरी

मार्ग दुजा

सोपे सोपे म्हणुनी

मार्ग नेक दाविले

सारे फोल ठरले

कष्टाविणा

कष्टाविण नाही फळ

कष्टावर नाही सुख

क्षणिक सारे मिळते ते

कष्टाविणा

पाखरू सुरवंटाचे

रात्रीत होत नाही

पंखात नाही धीर

कष्टाविणा

घामात ईश्वर नांदतो

आळसे ध्येय नासते

कष्टानेच भेटतो तेथे

परमेश्वर 


साहित्याला गुण द्या
लॉग इन