STORYMIRROR

manasvi poyamkar

Others

4  

manasvi poyamkar

Others

प्रखर उन...

प्रखर उन...

1 min
349

थेंब थेंब पाण्याला तरसली धरणी

मातीतले अंकुरही जळुन खाक झाले आहे

कधी होती पावसाची सर

आज तिथे कोरड्या निस्तेज वाटा आहेत

या निस्तेज ओसाड माळात

उरलय एकच झाड

कधी त्याला प्रेम दिल..आपुलकीन वाढवल

आज मात्र प्रेम आहे...आपुलकी आहे

पण दुर्दैव माझ की

माझ्या अश्रुंनी मी आज तुला वाचवू शकत नाही

तुला पाण्याची गरज आहे

पण मी

डोळ्यातल्या अश्रुंशिवाय मी तुला काही देवू शकत नाही

कधी हे भरल आभाळ माझ अंगण वाटायच

आज मात्र रस्त्यावर बिर्हाड उघड पडलय

हे आभाळाच खायला उठलय

आज तुझे चांदणे सुख देत नाहित

तर देतात फक्त चटके

प्रखर उन्हाचे...अन परिस्थितीचे....

तरिही पेटलेल्या रानात मी वाट पहात आहे

रात्रीला ह्या असेल कधितरी सकाळ

त्या निशब्द अंधारात मी वाट पहात आहे

सुखद चांदण्याची...

भरलेल्या आभाळाची..

पावसाच्या सरींची....


Rate this content
Log in