प्रकाश
प्रकाश
प्रकाश सोनेरी सुर्यकिरणांचा
प्रकाश काळोखाला संपवणारा
प्रकाश सकारात्मकतेकडे नेणारा
प्रकाश चंदेरी चंद्राच्या किरणांचा
प्रकाश नकारात्मकतेला संपवणारा
प्रकाश उजेडाकडे नेणारा
प्रकाश न्युनगंड संपवणारा
प्रकाश काळोखातल्या पणतीचा
प्रकाश ध्येय दाखवणारा
प्रकाश कणखर दिपस्तंभाचा
प्रकाश आशेच्या किरणांचा
प्रकाश नवनीत नाविण्याचा
प्रकाश स्वप्नपूर्तीकडे नेणारा
प्रकाश लढण्याच्या प्रेरणेचा
प्रकाश जिंकल्याच्या स्फुर्तीचा
प्रकाश तेजोमय शक्तीचा
प्रकाश कधीही नसंपणारा
