प्रकाश किरण
प्रकाश किरण
1 min
323
असाच एक दिवस मी
मित्रांसोबत घालविला
कळले त्याच दिवशी
जगण्याला अर्थ आला
झाला आठवणींचा तेव्हा
पुन्हा एकदा नव्याने उजाळा
कळले नाही मैत्रीत कधी
पावसाळा की उन्हाळा
फुलल्या काळया अबोल
अन् काटेही बोलके झाले
पण भावनेच्या ओझ्याने
दोन्ही डोळे मात्र पाझरले
सोडून जाता पुन्हा एकदा
रडे वाट ती नागमोडी
मन म्हणाले मनाशी आता
कुणाशी केव्हा करीन खोडी
समजले आज मला मित्र
म्हणजे किरण प्रकाश देणारा
न बोलताही ऐनवेळी कधी
मुक्यानेच समजून घेणारा
