STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Others

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Others

प्रजासत्ताक भारत..

प्रजासत्ताक भारत..

1 min
222

गगनी फडफडतो हा तिरंगा

ही या देशाची शान हो,

होतो साजरा आनंदाने

 हा प्रजासत्ताक दिन हो...।


शूरवीरांनी दिले बलिदान

या भारतमातेसाठी ,

दिले स्वतंत्र्य मिळवून 

किर्ती त्यांची मोठी.

त्या वीरांच्या शौर्याचा,आम्हा अभिमान हो...।


प्राणापेक्षा प्रिय असे ही

अम्हा ही भारतमाता ,

या मातेच्या चरणी आम्ही

टेकवीतो हा माथा.

गाऊ महती या देशाची,गाऊ गुणगान हो..।


नांदती सारे इथे सुखाने

सारेच भाऊ भाऊ ,

जात पात नी धर्मभेद

सोडून सारेच देऊ .

भारतभूमी ही शूरवीरांची ही संतांची खाण हो...।


सिमेवरती लढतो जवान

पर्वा न करता जीवाची,

देऊन बलिदान करतो

रक्षा भारत मातेची.

रक्षण करण्या भारतमातेचे देऊ हा प्राण हो...।


या मातेला करून वंदन

शपथ सारेच घेऊ ,

रक्षण करण्या भारतभूचे

एकजुटीने सारे राहू.

जगू मरु आम्ही देशासाठी देऊ बलिदान हो...।


वंदन करूया भारतमातेला

तिरंगी या ध्वजाला,

देशासाठी दिले बलिदान

त्या अमर हुतात्म्यांना.

देई आम्हा प्रेरणा तो सिमेवरचा जवान हो...।



Rate this content
Log in