प्रियकर माझा
प्रियकर माझा
सांगत नाही कधी
प्रेम जरा शब्दाने
कविता होऊन माझी
शब्दास जगतो तो
बोलणे ना त्याचे
दिसते कशी जरा मी
फोटोत प्रत्येक माझ्या
भाव ओततो तो
देत नाही कधीही
शब्दात र्धैर्य मला
संंकटी खंबीर माझ्या
उभाच ठाकतो तो
कधी पाहली ना त्याने
कपडयावरील नक्षी
सूगंध पदराचा माझ्या
श्वावासात भारतो तो
शब्दच नसे कधीही
कौतूक करण्या प्रियेचे
पण शब्दाला प्रियेच्या
आदर्श मानतो तो
मांडत नाही कधीही
प्रेम नजरेत आपले
प्रेम असीम त्याचे
मनात दडवतो तो
वेळ नसे त्याला
कामातूनी स्वतःच्या
काळजी प्रियेची
पण नित्य वाहतो तो
काय मानू प्रिया रे
असे निरागस प्रेम तूझे
क्षणोक्षणी माझ्या
हदयात राहतो तो
किती पुजावी रे
मूर्ति तूझी गाभारी
प्रेमाचे पावित्र्य
अंतरात राखतो तो
