प्रिय दिनदर्शिका
प्रिय दिनदर्शिका
1 min
279
नवीन वर्षाच्या निमित्ताने
तुला टांगले जाते भिंतीला
महिन्यात काय काय घडले
लिहीत राहते त्या तारखेला
दिनांक वार महिना वर्षासह
तिथीची ही मिळते माहिती
पौर्णिमा अमावस्या सोबतच
कळते केव्हा आहे चतुर्थी
दिवस आठवणीत राहावे म्हणून
त्या तारखेला करते खाणाखुणा
विसरुच शकत नाही तुझ्यामुळे
डोळ्यासमोर येतो पुन्हा पुन्हा
पेपरवाल्याचा महिन्याचा हिशेब
दूधवाल्याचे किती झाले खाडे
घरमालकांसोबत नको कलह
तुझ्यावर लिहीते किरायाचे भाडे
आम्हा गृहिणींची रोजनिशी आहे
हीच भिंतीवर टांगलेली दिनदर्शिका
पावलोपावली आम्हा मदत मिळते
तूच आहे आमची खरी मार्गदर्शिका
