प्रिय चहा
प्रिय चहा




कोण म्हणत विष याला,कोण म्हणत अमृत.
याच्या शिवाय आयुष्य कस वाटत अतृप्त.
सोबत तुझी,संगत तुझी जणू उत्साहाच टॉनिक.
तुझ्या वर आपली जान छिडकतात,किती तरी आशिक.
रंग तुझा स्वाद तुझा जणू मोहमाया.
तुझ्या एका घोटा साठी वेडी सारी दुनिया.
तुझ्या सवे मैफील रंगे,कवितेत ही जान येते.
तू असता सोबत गप्पांना ही उधाण येते.
पावसा सोबत तुझी सोबत,जगातलं बेस्ट कॉम्बिनेशन.
जगा वेगळं अस हे चहा नावाचं रसायन..