STORYMIRROR

manasvi poyamkar

Others

4  

manasvi poyamkar

Others

प्रिय बाबास...

प्रिय बाबास...

1 min
175

प्रिय बाबास,

वेस ओलांडून चालली

लेक तुझी सासरी

सहवास आता विरुनी जाईल

आठ्वण ठेवुनी माहेरी....

समजुत माझी घालताना

तुझ्या डोळ्यात येतय पानी

सावरुन धरलास भावनांचा बांध

आपल्या विरहाच्या क्षणी...

आडनाव माझ बदलल तरी

नात आपल तुटत नाही

दिल्या घरी सुखी रहा

अस बोलून तुझ कर्तव्य संपत नाही...

फिरुनी येतिल पाऊल माझे

तू एकदा बोलावून तर बघ

हसूनी मीही करेल सारे

तुही इथे हसुन जग...

ओझ नाही मी तुझ

मी तर आधार आहे तुझा

तुझ्या सगळ्या सुख दूखात

हक्क सदैव आहे माझा.....

समर्थ आहे सगळ्या कर्तव्याना

तुझी ही परी आता नाही लहान

शपथ आहे तुला या लेकिची

आनंदाने कर हे कन्यादान....



Rate this content
Log in