परिवर्तन
परिवर्तन
माझे शहर होते टुमदार काल
आता कसे झाले कमालीचे बकाल
माणसे होती सज्जन अगत्यशील
बदल झाला कालौघात नसे शील
साधी भोळी माणसे नसे झकपक
सहज धन कमविती महाठक
पिंपळ, वड, निंब नि गुलमोहोर
बूच, बहावा,कांचन, नीलमोहोर
झाडे होती रस्त्याच्या दुतर्फाने दाट
शीण घालवी शीतल सावलीचा थाट
पाणपोई पांथस्थांची मिटवी तहान
नसे प्रसिध्दी आतिथ्याचे सहज दान
चौकाचौकात पारांवर मंदिरे छान
मारूती, गणपती,देवी भवानी मान
मंडई मध्ये ताज्या भाज्यांची रेलचेल
स्वस्त फळे रसदार ,आरोग्याशी मेळ
पाणी शुद्ध, निर्मळ, नाही कुठे भेसळ
नव्हती आंदोलने नव्हती चळवळ
उपाशी राहिला नाही कोणी गरिबीने
भिकारी नव्हता कोणी हात अजीजीने
हाताला होते काम कर्ज नव्हते कांही
चैनी विलासी वस्तूंची भुरळ जराही
जुमानले नाही जेव्हा कुटुंब कल्याण
वाढली लोकसंख्या भोवली वरताण
बिघडले सारे तंत्र विकास नावाने
आता नवीन सरकार त्यांच्या मंत्राने
