परिवार
परिवार
1 min
211
संसार झालं मंदिर
आलं सोन्याच्या पावली
दुःखात सुखाने राहू
होऊन ऊन सावली
सात सुरांतुनी माझ्या
मी आरती गायली
दुःखात सुखाने राहू
होऊन ऊन सावली
सात जन्माची साथ
आली पावलोपावली
दुःखात सुखाने राहू
होऊन ऊन सावली
सासू असते आई
आधार होतात मुली
दुःखात सुखाने राहू
होऊन ऊन सावली
