प्रिती
प्रिती
1 min
254
मावळतेय माझी प्रिती
मावळणारी हीच निराशा
देत असते आश्वासन
की उगवण्याची आशा
मी क्षणक्षण भंगलो
त्या ढगाआड दडलो
दुःखाला पाठीशी घेत
सुखाच्या शोधात हिंडलो
सुखाच्या शोधात सुद्धा
मानवतेचा अर्थ आहे
इथे कोणालाच काहीनाही
सगळं काही व्यर्थ आहे
मावळतेय माझी प्रिती
मावळणारी हीच निराशा
देत असते आश्वासन
की उगवण्याची आशा !!!!
